
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी रविवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून 49 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. शहरात 58,770 मतदार असून त्यामध्ये 28,746 पुरुष आणि 30,023 स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी नऊ वाजे पर्यंत 8 टक्के मतदान झाले होते.
नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचा प्रदीप उर्फ बंड्या साळवी, भाजपचे ॲड.दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे मिलिंद कीर, मनसेचे रूपेश सावंत निवडणूक लढवत आहेत.



























































