
सामना ऑनलाईन । अमरावती
देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना अमरावतीमध्ये मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुलाच झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर काही अतीउत्साही कार्यकर्त्यांचा धिंगाणा पाहायला मिळाला.
स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याकरिता या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला येथे डीजे लावून देशभक्तीपर गाणी वाजविली जात होती, मात्र थोड्या वेळानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांची गाणी लाऊन अतिउत्साही कार्यकर्ते धिंगाणा करत नाचू लागले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ‘आला बाबुराव’ गाण्यावर कार्यकर्त्यांचा धिंगाणा स्पष्ट दिसत आहे. निदान स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तरी कोणती गाणी वाजवावी याचंही भान त्यांना कसं राहिलं नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. नेटकऱ्यांनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

























































