टी-20 वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानच्या ‘स्पेशल’ संघाची निवड, धोनी-धवन बाहेर, पंतला संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीचा टी-20 वर्ल्डकप यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानच्या संघाने आतापासून तयारी सुरू आहे. 2007 मध्ये पहिल्याच टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी झेंडा फडकावल्यानंतर आता 13 वर्षानंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानचा संघ विजयासाठी जीवाचे रान करताना दिसेल. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने 15 सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडलेल्या संघात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बेस्ट ‘फिनिशर’ महेंद्रसिंह धोनी आणि विस्फोटक सलामीवीर शिखर धवन यांना स्थान देण्यात आलेले नाही. यष्टीरक्षक म्हणून लक्ष्मणने ऋषभ पंतला संधी दिली आहे. लक्ष्मणने टीव्ही चॅनेल ‘टेन स्पोर्ट’सोबत आपला हा संघ घोषित केला आहे.

‘त्या’ खेळाडूला मिळू शकते वर्ल्ड कपचे तिकीट, विराटचे संकेत

एक दिवसीय वर्ल्डकपमध्ये जायबंदी झालेला शिखर धवन याने दुखापतीनंतर पुनरागमन केले. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध लढतीत शिखर मैदानात उतरला मात्र त्याने 29 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तो आऊटऑफ फॉर्म दिसला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनी याने एक दिवसीय वर्ल्डकपपासून एकही सामना खेळलेला नाही.

vvs-laxman

पंतला दिली संधी
धओनी 2019 मध्ये फक्त 5 टी-20 लढती खेळला. यात त्याने 43.33 च्या सरासरीने 130 धावा केल्या. तर धवनने 12 लढतीत 22.66 च्या सरासरीने 272 धावा केल्या. यात पंतने सर्वाधिक 16 टी-20 लढती खेळल्या असून 21 च्या सरासरीने 252 धावाही त्याने केल्या.

लक्ष्मणचा ‘स्पेशल’ वर्ल्डकप संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, मनिष पांडे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार.