
लघु पाटबंधारे विभागाने तिळसे बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्यामुळे वाडावासीयांना आता धो धो पाणी मिळणार आहे. वाडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधाऱ्याची पातळी कमी झाल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती.
वाडा शहराला वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या बंधाऱ्याची पाणी पातळी कमी झाल्याने वाडा शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तहसीलदार, गटविकास अधिकारी व लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करत अतिरिक्त पाणी वाडा शहराला उपलब्ध करून दिले आहे. शहराला वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र एप्रिल व मे महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी कमी होते. यंदाही हे पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. पाणीटंचाईची ही वस्तुस्थिती वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे मांडली. त्यानंतर त्यांनी लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाने तिळसे येथील दरवाजे उघडले आणि सिद्धेश्वर बंधाऱ्यात मुबलक पाणी साचले आहे.
नागरिकांनी मानले नगर पंचायतीचे आभार
सिद्धेश्वर बंधाऱ्यातील पाण्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. भटकावे लागत होते. मात्र नगर पष्टे यांनी याप्रकरणी यशस्वी तळ गाठल्यामुळे शहरात भीषण पाण्यासाठी नागरिकांना वणवण पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज मध्यस्थी केल्याने हा पाणीप्रश्न मिटला आहे. त्यामुळे नागरिकांनी पष्टे यांचे विशेष आभार मानले आहेत.





























































