वडखळ येथे लॉज व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या, गुप्तांगही छाटले

पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह (वय- 40) राहणार वडखळ नाका यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. तसेच त्यांचे गुप्तांगही छाटण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पेण तालुक्यातील  वडखळ येथील सावली लॉज मधील रूम नं.115 मध्ये सावली लॉज व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह यांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांचा गळा व गुप्तांग कापून हत्या केली. त्याचे गुप्तांग कापून त्यांच्या डोळयावर ठेवून आरोपीने पलायन केले. सदर प्रकार मंगळवार रात्री 8 ते रात्री 12.30 वाजण्याच्याच्या दरम्यान घडला. या हत्येची खबर लाँज चालक संदिप बाळू पाटील यांनी वडखळ पोलिसात दिली. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देवून घटनेची पाहणी केली आहे. याबाबत वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडखळ पोलीस करीत आहेत.