मूल दत्तक घ्यायचंय… साडेतीन वर्षेथांबा! संथ प्रक्रियेची हायकोर्टाकडून दखल

बाळ होण्यात अडचणी व इतर कारणास्तव अनेक दांपत्ये मूल दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारतात. मात्र ही प्रक्रिया रटाळ असून मूल दत्तक घ्यायचे असल्यास साडेतीन वर्षे इच्छुक पालकांना वाट पाहावी लागते. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी आज स्युमोटो याचिका दाखल करून घेत पेंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत पालकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत असल्याचा अहवाल एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला असून पालकांना वाट पाहण्याचा कालावधी साडेतीन वर्षांवर पोहोचला आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर यावर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणात ज्येष्ठ वकील मिलिंद साठे व अॅड. गौरव श्रीवास्तव यांची अमायकस म्हणून नेमणूक केली.