
वाहतुकीबाबत संदेश आणि संवाद साधण्यासाठी आवश्यक असणारी एक वॉकीटॉकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वॉकीटॉकी चोरीला गेल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार विपुल मोकल हे ट्रॉम्बे वाहतूक विभागात रायडर म्हणून काम करतात. सीओआर, फिक्स पॉइंट बंदोबस्ताचे ते काम करतात. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून ट्रॉम्बे वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना वायरलेस सेट, 27 ई चलन मशीन, ई चलन मशीन चार्जर, 12 वॉकीटॉकी पुरवण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात मोकल हे सीआरओ हे कामाला आले. त्याने डय़ुटी चार्ज घेतला तेव्हा त्यांना एक वॉकीटॉकी कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. वॉकीटॉकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच मोकल यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार केली.



























































