पंढरपूरमध्ये घाटाची भिंत कोसळली; लोक अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरात चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. पावसामुळे आडोशासाठी या भिंतीजवळ उभे राहिलेले काही लोक दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घाटांवर भीक मागणारे काहीजण भितींच्या आडोशाला उभे असल्याची माहिती मिळाली आहे. भिंत कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाळा. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर जेसीबी आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पंढरपूरमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.