
वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार किरण तावडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे अनिल कोकीळ यांचा पराभव केला. किरण तावडे यांना 14845 मते मिळाली आहेत.
मुंबईचा राजा पावला… बाप्पाने आशीर्वाद दिला आहे.. लालबाग परळमध्ये गद्दारांना स्थान नाही हेच मतदारांनी दाखवून दिले. शिवसैनिकांनी आपला किल्ला राखला. सुधीर साळवी यांनी मला खूप मदत दिली, असे किरण तावडे म्हणाले.





























































