हिंगणघाट जळीतकांड पीडितेची प्रकृती गंभीरच, जखमांमध्ये संसर्ग होण्यास सुरुवात

1036

वर्धा जिह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न झालेल्या तरुणीची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याचे समजते. या पीडितेच्या शरीरावरील भाजलेल्या भागात आता संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. पीडितेवर सध्या नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केले आहे.

‘जळीतकांडातील पीडितांमध्ये संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते. यातही दोन प्रकार असतात एक इनर व आऊटर इन्फेक्शन. सध्या पीडितेचा हार्ट रेट वाढतोय. काल तो 100 च्या खाली होता आज 100 च्या वर गेला आहे. हार्ट रेट वाढणे हे संसर्ग व्हायला सुरुवात झाली आहे याचे लक्षण आहे. पीडितेची त्वचा जळाल्यामुळे तिच्या जखमातून जंतूसंसर्ग अगदी पटकन होतो. त्यात प्रतिकारक्षमता देखील कमी झालेली असते. संसर्गानमुळे पीडितेचा त्रास वाढू शकतो. मात्र आम्ही त्यावरही औषध देत आहोत. पीडितेला इनर इन्फेक्शनदेखील होऊ शकते. पीडितेच्या फुप्फुस्साला देखील जखम झाले असेल तर त्यात संसर्ग होऊ शकते’, असे पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. पीडितेवर शुक्रवारी आणखी एक शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचेही तिच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या