वक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही

832

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या प्रक्षोभक विधानावरून माफी मागणे टाळत फक्त स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी देशभरात केली जात आहे. देशातील 15 कोटी मुस्लिम नाराज असल्याचे मला बोलायचे होते, मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यामुळे वादंग निर्माण झाला, असा आरोप पठाण यांनी केला. कुणाच्या भावना माझ्या वक्तव्याने दुखावल्या असतील तर मी ते मागे घेतो असे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पठाण यांनी स्पष्ट केले.

15 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदूंवर भारी पडतील असे वक्तव्य वारिस पठाण यांनी सीएएविरोधी जाहीर मेळाव्यात बोलताना केले होते. मात्र देशातील 15 कोटी मुस्लिम नाराज असल्याचे मला सांगायचे होते. या देशात 100 असे लोक आहेत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कट्टर समर्थक आहेत. त्या 100 जातीयवादी लोकांवर आमचे 15 कोटी भारी पडतील असे मला म्हणायचे होते, मात्र काही माध्यमांनी माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवत त्याचा विपर्यास केला, अशी सारवासारव वारिस पठाण यांनी पत्रकारांसमोर केली.

आपली प्रतिक्रिया द्या