वारजे पूलानजीक बर्निंग कारचा थरार, पती-पत्नी बचावले

वारजेतील डुक्कर खिंडीच्या पुलावर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत मोटार थांबविल्याने अनर्थ टळला आहे. त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमक दलाने दिली आहे. ही घटना आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली.

साताऱ्यातील अजय बाबरन्स हे पत्नीसह मुंबईच्या दिशेने मोटारीतून चालले होते. दुपारी दोन वाजता ते वारजेतील डुक्कर खिंड जवळील उड्डाण पुलावरुन जाताना अजयला मोटारीतून धुर निघताना दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोटार पुलावर थांबवित बाहेर पडले. मोटारीत आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे काहीवेळ महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोटारीतील आगीवर नियंत्रण मिळविले.

आपली प्रतिक्रिया द्या