Washim News – नामकरण समारंभाहून परतत असताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात कुटुंबाचा करुण अंत

पुण्याहून नामकरण समारंभाहून घरी परतत असताना नागपुरच्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वनोजा आणि कारंजा दरम्यान गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या हा अपघात घडला. कार चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशइम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैदेही जयस्वाल, संगीता जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर चेतन जयस्वाल असे गंभीर जखमीचे नाव आहे. जयस्वाल कुटुंब मूळचे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहेत. सर्वजण पुणे येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते.

पुण्याहून नागपूरला परतत असताना समृद्धी महामार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलेय यामुळे कार डिव्हायरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.