ट्रम्प यांच्यावरील महाभियोग सुनावणी 8 फेब्रुवारीपासून

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणण्यात आलेल्या महाभियोगाची सुनावणी 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत ट्रम्प दोषी आढळले तर त्यांना पुढची निवडणूक लढता येणार नाही. अमेरिकन सिनेटचे मेजॉरिटी नेते चक शुमर यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रक्रियेबाबत प्रसिद्धीमाध्यमांना माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी 6 जानेवारीला पॅपिटॉल हाऊसमध्ये घुसून घातलेला गोंधळ आम्हाला विसरता येणार नाही. अमेरिकन लोकशाहीला लागलेला हा कलंक आम्ही विसरायचा प्रयत्न करतोय, पण देशाचे ऐक्य मजबूत करण्यासाठी जनतेपुढे सत्य येणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या प्रक्रियेचा आग्रह धरला आहे, असे सिनेटर शुमर म्हणाले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या