जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश, नगर-नाशिकचे शेतकरी संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्यात अनेक भागाकडे पावसानं पाठ फिरवल्यानंतर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जायकवाडीत पाणी सोडण्यास नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. मराठवाड्यासाठी जायकवाडीत पाणी सोडा अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत. अशातच प्रशासनाने आज 9 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा पाणी प्रश्न पेटणार आहे.

सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास श्री. कोहीरकर यांनी 8.99 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना आदेश दिले. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे.

दरम्यान, नगर आणि नाशिक जिल्हातील राज्यकर्त्यांनी पुन्हा विरोध करण्यास सुरुवात केली आहे.