नगर- पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती, लाखो लीटर पाणी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

नगर शहरातील आगरकर मळा येथे गेल्या दोन तासांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती सुरू झाल्यामुळे या परिसरामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे या परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

नगर शहराला महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. येथील आगरकर मळ्यामध्ये दहा लाख लिटरची पाण्याची टाकी आहे. रविवारी सकाळी या पाण्याच्या टाकीजवळील असलेला पाण्याचा वॉल्व्ह झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. दोन तासापासून त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या प्रकरणाची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. पण दुसरीकडे साचलेल्या पाण्यामुळे परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे.