कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी 20 फुटांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ असे सात बंधारे पाण्याखाली गेले. आजही दिवसभर अल्प विश्रांती घेत पावसाचा जोर कायम राहिला. सायंकाळी सातच्या सुमारास पंचगंगेची पातळी 19 फूट 9 इंच झाली होती. काल सकाळपासून दोन फुटाने पाणी पातळी वाढली.

सध्या राधानगरी धरणात 2.97, तुळशी 0.89, वारणा 12.67, दूधगंगा (काळम्मावाडी) 2.92, कासारी 0.84, कडवी 0.92, कुंभी 1.17, पाटगाव 1.24, चिकोत्रा 0.43, चित्री 0.36, जंगमहट्टी 0.33, घटप्रभा 100 टक्के भरले आहे. सध्या यामधून दोन हजार 72 क्युसेक विसर्ग सुरू आहे. जांबरे 0.40, आंबेओहोळ 0.40, तर कोदे या लघुपाटबंधारे प्रकल्पात 0.17 टीएमसी पाणीसाठा झाल्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे. गेल्या 24 तासांत जिह्यात सरासरी 14  मि.मी. पावसाची नोंद झाली.