1 / 5
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लखनौमधील चौधरी चरणसिंह विमानतळ परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विमानतळ परिसरातच पाणी साचल्याने प्रवाशांना बाहेर पडणेच कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालक प्रवाशांकडून मनमानी करत पैसे उकळत आहेत.
























































