पिसे बंधाऱ्यावरील झडपांच्या दुरुस्तीच्या कामामुळे 17 मे ते 21 मे दरम्यान मुंबईत 10 टक्के पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम सोमवार 17 मे 2021 ते शुक्रवार 21 मे 2021 या काळात हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार 17 मे 2021 ते शुक्रवार 21 मे 2021 या कालावधीत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या