
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील नागरिकांना दोन दिवस 100 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी पाणी सोडण्यात येणार नसल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. 25 सप्टेंबर रोजी सकाळपासून येथे पाणीकपातीला सुरुवात होईल. दुसऱया दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात असेल. जुहू, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ, वांद्रे, खार, गोरेगाव, विलेपार्ले, राम मंदिर रोड आणि बिंबीसार नगर येथे 100 टक्के पाणीकपात असेल तर एच पूर्व वॉर्डातील सांताक्रुझ पूर्व, प्रभात कॉलनी, आशा नगर, जाकू क्लब, सेवा नगर आणि हनुमान टेकडी या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.






















































