मुंबईत 30 आणि 31 जानेवारीला चोवीस तास पाणीपुरवठा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहराच्या काही भागांत 30 आणि 31 जानेवारी रोजी पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.

पालिकेच्या भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण पेंद्रास अतिरिक्त 4 हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार असून भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जलवाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आदी कामे करण्यासाठी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुसऱया दिवशी म्हणजेच 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागांतील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर 2 विभागातील पाणीपुरवठय़ात 25 टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.