दसरखेड येथील पेय जल योजनेची पाण्याची टाकी कोसळली

869

सामना प्रतिनिधी । मलकापूर

मलकापूर तालुक्यातील ग्राम दसरखेड येथील भारत निर्माण पेय जल योजनेची 50 हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी सोमवारी सायंकाळी कोसळली. दसरखेड गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 2013 -14 मध्ये जिल्हा परिषदेतंर्गत या टाकीचे बांधकाम झाले होते.ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगतले. या टाकीशेजारी शाळा असून ईदनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या