अण्वस्त्र बनवले पण व्हेंटिलेटर नाही, पाकिस्तानने व्यक्त केली खंत

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने हिंदुस्थानकडे व्हेंटिलेटर मागितले होते. हिंदुस्थानने जर मदत केली तर पाकिस्तान कायम ऋणी राहिल असे म्हटले होते. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाने अण्वस्त्र बनवले पण व्हेंटिलेटर नाही अशी खंत व्यक्त केली आहे. देशवासियांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमध्येही कोरोनाचे संकट वाढले आहे. पाकिस्तानात कोरोनाचे 4 हजार 788 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानची आरोग्य सेवा आधीच ढासळलेली आहे अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती. तसेच सध्या पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगात व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे. व्हेंटिलेटर बनवणे हे काही रॉकेट सायन्स नाही. पण आपण सुरूवाती पासून अण्वस्त्र बॉम्ब बनवण्यावर भर दिला. आरोग्य सेवेवर आपण भर दिला नाही. अन्यथा आज आपली अवस्था अशी झाली नसती असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या