याआधी पाकड्यांना तीनदा धूळ चारली, आम्ही आजही सज्ज आहोत; माजी सैनिकांनी दाखवला जोश

Operation Sindoor

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक चिंता वाढली आहे. या युद्धजन्य परिस्थितीत हिंदुस्थानच्या माजी सैनिकांनी जोश दाखवला आहे. आम्ही आमची शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली आहे. मात्र, त्याचा वापर करण्यास आम्ही विसरलो नाही. आम्ही आजही पाकड्यांना धूर चारण्यास सज्ज आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

देशभरातून, उद्योगपती, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हिंदुस्थानी लष्करासोबत आहे. लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे देशभरात कौतुक होत आहे. अशा परिस्थितीत माजी सैनिकही पुढे सरसावले आहेत. तसेच पाकड्यांना पुन्हा धूळ चारण्यास आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजस्थानमधील धोलपूर येथील माजी सैनिकांनी सांगितले की, पाकिस्तान भारताशी दहा दिवसही युद्ध करू शकत नाही. आपले लष्कर प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा अग्रेसर आहे. गरज पडल्यास आजही आपण युद्धात सहभागी होण्यास सज्ज आहोत. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मदतीने चोरांसारखे युद्ध लढतो. ते कधीही समोरासमोर लढू शकत नाही, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

आम्ही आमची शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली आहेत. ती कशी वापरायची हे आम्ही विसरलेलो नाहीत. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये सहभागी असलेल्या 80 वर्षांच्या माजी सैनिक आजही लढण्यास सज्ज आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सैनिक नाहीत तर दहशतवादी आहेत. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता हिंदुस्थानने POK ताब्यात घेत दहशतवाद कायमचा संपवावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पाकिस्तान दहशतवाद्यांना निधी आणि आश्रय देत आहे. पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे. हिंदुस्थानी लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जी कारवाई केली आहे, ती सतत सुरू राहिली पाहिजे, ज्यामुळे पाकिस्तानचा कणा मोडेल. लष्कराने पाकिस्तानात घुसून हल्ला करावा आणि POK परत मिळवालवे. हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवाया थांबतील आणि उर्वरित दहशतवादी अड्डे देखील नष्ट होतील.

कारगिल युद्धात सहभागी असलेले सुभेदार प्रणव मुखर्जी, सुभेदार मेजर रमेश सिंह परमार, सुभेदार मेजर यशपाल सिंह, सुभेदार कैलाश चंद्र शर्मा, कॅप्टन अशोक परमार, हवालदार राहुल कुमार, हवालदार गोविंद शर्मा यांनी सांगितले की, हिंदुस्थानी सैन्यासमोर कोणीही टिकू शकत नाही आणि आम्हीही शस्त्रे चालवण्यास सज्ज आहोत. माजी सैनिकांनीही दाखवलेल्या जोशामुळे त्यांचेही कौतुक होत आहे.