गद्दार आमदारांना धडा शिकवणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची गरज आहे. त्यामुळे कोणी कितीही गद्दारी केली तरी शिवसेना डगमगणार नाही. गद्दार आमदारांना धडा शिकवणारच असा निर्धार रायगड जिह्यातील शिवसैनिकांनी शनिवारी केला. शिवसैनिकांची वज्रमुठ या नाठाळांच्या माथी हाणू असा इशाराही त्यांनी दिला. महाडचे भरत गोगावले, कर्जतचे महेंद्र थोरवे, अलिबागचे महेंद्र दळवी या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर शनिवारी खारघर येथे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या संपर्क कार्यालयात मेळावा झाला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या जीवावर तुम्ही आमदार झालात आणि गद्दारी करून त्यांचा अपमान केलात. आमचे बहाद्दर शिवसैनिक तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा गीते यांनी यावेळी दिला. गद्दारांना यापुढे वेशीवरच अडवा आणि शिवसेनेची ताकद दाखवा असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.