मदरशामध्ये सापडली बेकायदेशीर बंदुकी आणि काडतुसं, सहा जणांना अटक

83

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या एका मदरशामध्ये बेकायदेशीर बंदुकी आणि काडतूसे आढळली आहेत. या प्रकरणी मदरशाच्या संचालकासह सहा जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये दारुल कुराण हमीदिया या मदरशामध्ये पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये एक पिस्तुल, दोन मॅगझीन, चार देशी पिस्तुल आणि 24 जिवंत काडतुसे मिळाले आहे.त पोलिसांनी मदरशाचा संचालक मोहम्मद साजिद याच्यासह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक आणि आयबीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचली आहे. हे प्रकरण हत्यार्‍यांच्या तस्करीचे असून त्याचे मूळ बिहारमध्ये आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी ही हत्यारे औषधांच्या डब्यात लपवले होते. ही हत्यारे सापडल्यानंतर पोलिसांनी मदरशाचा संचालक मोहम्मद साजिद, कारी, सिकंदर, कारी साबिर, जफर, अजीजुर्रहमान आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या