वेब न्यूज – रंगांधळेपणावरती लेन्सेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक स्तरावरती भेडसावणाऱ्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे रंगांधळेपणा होय. सामान्य लोकांसाठी हा फारसा माहितीचा विषय नाही, पण कधी कधी थट्टेचा मात्र ठरणारा आहे. प्रत्यक्षात रंगांधळेपणाचा त्रास सहन करणारी व्यक्ती मात्र प्रत्येक दिवशी काय त्रास सहन करते हे तिलाच माहिती. रोजच्या जीवनात साधी केळी पिकलेली आहेत का कच्ची हेदेखील रंगांधळेपणामुळे कळणे अवघड होत असते. मात्र आता इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील दोन तज्ञांनी रंगांधळेपणा काहीसा कमी करून रंग ओळखण्यासाठी मदत करू शकणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्सचा प्रोटोटाइप बनवण्यात यश मिळवले आहे. रंगात सुधार करू शकणाऱ्या फिल्म्स लेन्सच्या पृष्ठभागावरती आणून या लेन्सच्या मदतीने योग्य रंग ओळखण्यासाठी मदत मिळते. सध्या बाजारात ‘clever frequency-filtering sunglasses’ सारखे काही पर्याय उपलब्ध आहेत, मात्र ही नवी कॉन्टॅक्ट लेन्स त्यांच्यापेक्षा जास्ती प्रभावी कार्य करू शकेल असा दावा करण्यात येत आहे.

Bionic Jellyfish –

jellyfish

शास्त्रज्ञांनी ‘Bionic’ (इलेक्ट्रॉनिक अवयव असलेला) जेलीफिश बनवण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर त्याच्या हालचालींना खऱ्या जेलीफिशच्या हालचालींपेक्षा तीसपट अधिक वेगवान बनवून त्या हालचालींवरती नियंत्रणदेखील मिळवले आहे. हा बायोनिक जेलीफिश तंतोतंत खऱ्या जेलीफिशप्रमाणेच हालचाली करतो. मायक्रोइलेक्ट्रॉनिक इम्प्लांटसह त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात येत आहे. या छोटय़ा, परंतु महत्त्वपूर्ण टप्प्याची गुरुकिल्ली पोर्टेबल मायक्रोइलेक्ट्रॉनिक स्विम कंट्रोलर आहे जे जेलीफिशला जोडल्यावर ‘पल्स वेव्ह’ निर्माण करू शकते आणि स्नायूंच्या हालचालींना उत्तेजित करू शकेल. आपल्या या नवीन शोधाचे भविष्य म्हणजे पाण्याखाली वावरणाऱ्या वाहनांच्या क्षेत्रात एक अनोखी क्रांती आणेल आणि विना आवाज, विना त्रास, प्रवासास सुखकर अशी वाहनांची एक नवी पिढी अवतरेल असे या शास्त्रज्ञांच्या टीमला वाटत आहे. लवकरच अशा प्रकारे तयार झालेल्या ंग्दप्ब्ंrग्ds ची एक फौजच आपल्याला पाहायला मिळेल जी सागराची अनेक न सुटलेली रहस्ये आपल्यासाठी उघड करेल आणि पाण्याखालील नवनवीन शोधांना चालनादेखील मिळेल.