वेबन्यूज- हायपरसॉनिक क्रॅमजेट तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) नुकतीच ओडिशाच्या किनाऱयावर हायपरसॉनिक क्रॅमजेट तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. डीआरडीओने हायपरसॉनिक क्रॅमजेट तंत्रज्ञान असलेले डेमॉन्स्ट्रेशन व्हेईकल वापरून अवकाशात एक मिसाईल डागले. वातावरणात पोचताच या मिसाईलने मॅक-6 अशी अत्यंत उच्च गती प्राप्त केली. या तंत्रज्ञानामुळे हिंदुस्थानला दोन मोठे फायदे होतील. प्रथमतः हे संरक्षण क्षेत्रात खूप योगदान देईल कारण क्षेपणास्त्र्ााचा त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होईल. दुसरे म्हणजे रॉकेट पाठवताना आता इंधन वाचवणे शक्य होणार आहे विशेषतः जोपर्यंत रॉकेट वातावरणात आहे. यामुळे वाहनाचे वजन कमी होईल. असे म्हटले जात आहे की हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये एखाद्या क्षेपणास्त्र्ााला सुपरसॉनिक वेगाने नव्हे तर हायपरसॉनिक वेगाने सोडले जाऊ शकते. विज्ञानाच्या भाषेत हायपरसॉनिकला ‘सुपरसॉनिक ऑन स्टिरॉइड’ म्हणतात. सुपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या गतीपेक्षा वेगवान (मॅक-1). आणि हायपरसॉनिक वेग म्हणजे सुपरसॉनिकपेक्षा कमीत कमी पाच पट अधिक वेग. त्याच्या वेगाला मॅक -5 असे म्हणतात, म्हणजे आवाजाच्या गतीच्या पाच पट. या वेगाने दिल्ली ते बीजिंग अंतर अर्ध्या तासात पार करणे शक्य असेल. न्यूटनच्या गती सिद्धांताचा तिसरा नियम असा आहे की, ‘प्रत्येक क्रियेला तितकीच पण विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते.’ याचा अर्थ असा की जेव्हा रॉकेटच्या आत इंधन जाळले जाते आणि तिचा वायू बाहेर पडतो तेव्हा तिचा प्रतिसाद रॉकेट (वाहन) ला वेगवान धक्का देतो ज्यामुळे त्याची गती वाढते. याला जेट प्रॉपल्शन म्हणतात. या नवीन तंत्रज्ञानामध्ये रॉकेट वातावरणातून ऑक्सिजन घेते आणि वेग वाढवते. याचा फायदा म्हणजे रॉकेटला दुप्पट इंधन देण्याची गरज नाही. परंतु हे तंत्र केवळ वातावरणातच वापरले जाऊ शकते. क्रॅमजेट तंत्रज्ञान वापरणारा हिंदुस्थान जगातील चौथा देश ठरला आहे.