वेब न्यूज – मोबाइल करा कोरोनामुक्त

1900

>> स्पायडरमॅन

सध्या कोरोना व्हायरसच्या धास्तीने सगळे जगच काळजीत आहेत. हा कागदावरून पसरतो का? फळं आणि भाज्यांवरती असतो का? कोणत्या धातूच्या कोणत्या पृष्ठभागावरती हा किती काळ कार्यरत असतो? या आणि अशा विविध काळजी लावणाऱया प्रश्नांच्या उत्तरासाठी जगभरातील लोक इंटरनेट धुंडाळत आहेत, तज्ञांचे सल्ले घेत आहेत. गंमत म्हणजे हे सगळे जगभरातील तज्ञ, विविध आरोग्य संस्था आपल्याला सतत साबणाने हात धुवा, किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरा आणि हात स्वच्छ ठेवा असे सल्ले सतत देत आहेत. पण आपण सतत जो हातात बाळगून असतो, आणि अन्न, वस्त्र्ा, पाणी च्या जोडीला जी आता आपली गरज बनली आहे त्या मोबाइल फोनचे काय? हा मोबाइल फोन कोरोनामुक्त कसा ठेवायचा? ह्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे? CDC आणि Apple सारख्या मातब्बर संस्था sopropyl मद्ययुक्त सॅनिटायझरचा वापर करायचा सल्ला देत आहेत. पण जोडीलाच हे वापरतानाच याच्या अतिवापराने स्क्रीनचे oleophobic coating खराब होण्याची भीतीदेखील घालत आहेत. अशावेळी एक सोपा उपाय जो या समस्यांना टाळतो तो म्हणजे ultraviolet-light (अतिनील-प्रकाश) सॅनिटायझरचा वापर करणे होय. निर्जंतुकीकरणासाठी यूव्ही-लाइट तंत्रज्ञान नवीन नाही – वैद्यकीय उद्योगात याचा वापर होतो आहे. हे सॅनिटायझर्स अतिनील-सी (यूव्ही-ए किंवा यूव्ही-बीऐवजी) प्रकाशाचा वापर करतात जो जंतुनाशक असून जंतू अर्थात व्हायरसच्या डीएनएला तोडू शकतो, आणि यामुळे या जंतूची पुनरुत्पादन प्रक्रिया आणि प्रसार दोन्ही रोखले जाऊ शकतात. इतर अतिनील सॅनिटायझर्स प्रमाणेच यासाठी फोनसोप उत्पादनाची निर्मिती करण्यात आली आहे. यात दोन अतिनील प्रकाश बल्ब वापरण्यात आले आहेत. निर्मात्यांच्या दाव्यानुसार 10 मिनिटांत 99.99 टक्के जंतू यामध्ये नष्ट होतात. झाकणाच्या आतील दिवे 360 डिग्री सॅनेटिलायझेशन प्रदान करतात, जे आपण साध्या हात् ाानेदेखील पुसू न शकणाऱया मोबाईलच्या भागांनादेखील निर्जंतुक करतात.

आपली प्रतिक्रिया द्या