वेब न्यूज

>> स्पायडरमॅन

दृष्टिदोष असलेल्यांसाठी ‘MANI’ ऍप

Reserve Bank of India (RBI) ने दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यास मदत करणारे ‘MANI’ ऍप तयार केले आहे. दृष्टिदोषामुळे नोटा ओळखण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातच नोटाबंदीनंतर वेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या काही नोटा चलनात समाविष्ट झालेल्या आहेत. अशावेळी दृष्टिदोषींना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना चलन ओळखण्यास मदत करणारे हे ऍप विकसित करण्यात आले आहे. Mobile Aided Note Identifier अर्थात ‘MANI’ ऍप हे एकदा मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले की, इंटरनेटच्या मदतीशिवायदेखील कार्यरत राहणार आहे. कॅमेऱयाच्या मदतीने चलनी नोट स्कॅन केल्यानंतर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन पर्यायी भाषांमध्ये तिच्याबद्दलची माहिती आवाजी स्वरूपात दिली जाण्याची सोय या ऍपमध्ये आहे. अर्थात, चलनी नोटा खऱया आहेत की खोटय़ा हे ओळखण्यासाठी मात्र या ऍपचा काहीही उपयोग होणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी गुगल artificial intelligence system ची मदत

गुगलच्या एका artificial intelligence system ने महिलांमध्ये सध्या वेगाने पसरत असलेल्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यात एखाद्या मोलाची कामगिरी करून दाखवली आहे. mammograms चे वाचन करून आणि क्रीनिंगच्या मदतीने कर्करोगाचे निदान करण्यात या system मुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता) अधिक अचूकता आणण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नेचर’ जर्नलमध्ये याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते रेडिओलॉजिस्ट मेमोग्राम तपासताना स्तनाच्या कर्करोगाचे निदान करताना जवळ जवळ 20 टक्के रुग्ण हे निरोगी समजून तसा रिपोर्ट देतात. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत क्रीनिंग केलेल्या सर्व स्त्रियांपैकी निम्म्या महिलांना false positive निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरमध्ये गुगल हेल्थमध्ये विलीन झालेल्या अल्फाबेट इंकच्या डीपमाइंड एआय युनिटच्या मदतीने ही artificial intelligence system तयार करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या