वेब न्यूज – एलॉन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

सध्या जगभरच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेली आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्याला बदलून टाकण्याची क्षमता असलेली व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क होय. 2017 सालापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या नंबरवर विराजमान असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांना दूर हटवत या माणसाने पहिल्या क्रमांकाची खुर्ची पटकावली. सध्याच्या घडीला हा मनुष्य जगभरात लोकप्रिय असलेली टेस्ला नावाची कार उत्पादन पंपनी चालवतो आहे. ही पंपनी ‘ग्रीन अजेंडा’ अर्थात पर्यावरणाचे रक्षण या एकाच उद्देशाने कार्यरत आहे. सध्या या टेस्ला पंपनीच्या शेअर्सनी प्रचंड झेप घेतली असून टेस्ला पंपनीची जागतिक बाजारपेठेतील किंमत 700 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. फॉक्सवॅगन, ह्युंदाई, टोयोटासारख्या नामवंत पंपन्यांच्या मार्पेट व्हॅल्यूपेक्षादेखील ही किंमत जास्ती आहे. या शेअर्सच्या उसळीमुळेच आज एलॉन मस्क यांची एपूण संपत्ती 185 बिलियन डॉलर्स इतकी प्रचंड झाली आहे. याच जोडीला एलॉन मस्क सध्या प्रचंड मागणी असलेली ‘सोलर एनर्जी सिस्टम’देखील उत्पादित करतात, जिची घरगुती वापरासाठीची मागणी प्रचंड वाढत चालली आहे. एलॉन मस्क अंतराळ क्षेत्रातदेखील कार्यरत असून अंतराळाचा अभ्यास, सामान्य जनतेसाठी अंतराळ प्रवासाच्या संधी अशा अनेक उपक्रमांवर ते काम करत आहेत. नुकतेच त्यांच्या अंतराळ पंपनीतर्फे ‘रियुजेबल रॉकेट’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ‘नासा’सारखी जागतिक दर्जाची विज्ञान संस्थादेखील एलॉन मस्क यांच्या भागीदारीत काही महत्त्वाचे अंतराळ प्रकल्प राबवीत आहे. हे सगळे कमी म्हणून की काय, हा मनुष्य सध्या अमेरिकेसाठी ‘सुपरफास्ट अंडर ग्राऊंड ट्रान्स्पोर्ट सिस्टम’ बनवण्याचा आराखडा तयार करतो आहे. जिद्द, चिकाटी, भविष्याकडे बघण्याचा अभ्यासू दृष्टिकोन यामुळे हा माणूस भविष्यात मानवी जीवनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडणारे अनेक यशस्वी शोध लावेल अशी शक्यता अनेक मान्यवर तज्ञ कायम व्यक्त करीत असतात. अर्थात दोन दिवसांपूर्वी अचानक एलॉन मस्कच्या पंपनीचे शेअर्स घसरले आणि त्याच्या संपत्तीत काहीशी घट होऊन ते पुन्हा दोन नंबरवर आले. अर्थात हे म्हणजे काही मस्क यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप नाही हेदेखील खरेच!

आपली प्रतिक्रिया द्या