आयपीजीए नॉलेजच्या वतीने खरीप पिकांच्या सद्यस्थितीवर बेबिनारचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील डाळीचे व्यवहार व उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था भारतीय साळी व तृणधान्य संघटनेने (आयपीजीए) खरीप पिकांच्या स्थितीवर या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. द आयपीजीए नॉलेज सीरिज या मालिकेअंतर्गत आयोजित हा वेबिनार शुक्रवारी  सायंकाळी 5 वाजता होणार आहे. खरीप पिकांची सद्यस्थिती या वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर वस्त्यांमध्ये केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग, जीजीएन रिसर्चचे वस्थापकीय भागीदार निरज रेसाई. सईच्या फोर-पी इंटरनेशनल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. कृष्णमूर्ती अग्रोप्युअर कॅपिटल फरसचे (जीपीए कंपिटल फरस) संचालक अनिश गोषत, कलंत्री प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कलंत्री यांचा समावेश आहे.

आयपीजीए अध्यक्ष जितू बेहता म्हणाले सध्या वर्षातला तो काळ आहे जेव्हा भारतात आणि परदेशातही सगळयांचे लक्ष खरीप हंगामाकडे आणि किती पिक येणार याकडे लागलेले असते. अशावेळी विविध विषयांतील तज्ज्ञांना एकत्र आणून यावर्षीच्या खरीप हंगामानून काय अपेक्षा आहेत याबद्दल एक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.”