
लग सोहळ्यात काहीवेळा असे किस्से घडतात की ते आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहतात. गुजरातच्या पाटणमध्ये असाच काहीसा किस्सा घडलाय. वरात ऐन रंगात आली असताना घोडा चक्क नवरदेवाला घेऊन पसार झाला. ऐनवेळी घोडय़ाने दगा दिल्याने नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात पोहोचायला उशीर झाला.
पाटणमधील रोडा या गावी वरात सुरू होती. पाहुणे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होते. मात्र संगीताचा कर्कश आवाज घोडय़ाला मानवला नाही. त्याने भर वरातीतून नवरदेवाला घेऊन धूम ठोकली. वरातीपासून एक किमी अंतरावर नवरदेव घोड्यावरून पडला. या प्रकारामुळे नवरदेवाला किरकोळ दुखापत झाली आहे.




























































