साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 03 डिसेंबर ते शनिवार 09 डिसेंबर 2023

>>नीलिमा प्रधान

मेष

प्रकृतीची काळजी घ्या

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. दगदग, धावपळ करताना प्रकृतीची काळजी घ्या. मैत्रीपूर्ण वागणे ठेवून यश मिळवावे लागेल. नोकरीत तडजोडीचे धोरण स्वीकारा. धंद्यात लाभ होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राग वाढवणाऱया घटना घडतील. जवळच्या व्यक्ती तुम्हाला सहकार्य करतील.

शुभ दिनांक : 5, 9

वृषभ

अहंकारयुक्त भाषा नको

सूर्य, चंद्र लाभयोग. चंद्र, शनि प्रतियुती. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत शब्द जपून वापरा. धंद्यात फसगत टाळा. अहंकारयुक्त भाषा त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व इतरांना सहन होणार नाही. वरिष्ठ नवीन कामे देतील. संसारात खर्च तणाव वाढेल.

शुभ दिनांक : 5, 6

मिथुन

वाद वाढवू नका

चंद्र, शुक्र लाभयोग, बुध, गुरू त्रिकोणयोग. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अधिकारी व्यक्ती तुमच्या स्वाभिमानाला ठेच लावायचा प्रयत्न करतील. शांत राहून काम करा. धंद्यात वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा. संसारात वाद उद्भवतील.

शुभ दिनांक : 3, 4

कर्क

प्रत्येक दिवस यशदायी  

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. कोणतेही वक्तव्य तापदायक ठरेल. मैत्रीत गैरसमज नको. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात चिंता सतावेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढलेला प्रभाव स्वतच सांगू नका. कायदा मोडू नका. कौतुक होईल. कलाक्षेत्रात नवीन संधी मिळेल.

शुभ दिनांक : 5, 6

सिंह

संयम बाळगा 

चंद्र, शुक्र लाभयोग, बुध, गुरू त्रिकोणयोग. रविवारी चिंता, तणाव, अडचणी जाणवतील. अहंकार, राग यामुळे शरीरावर ताण पडेल. माणसे दुरावली जातील. नोकरीत संयम ठेवा. धंद्यात लाभ होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा कमी पडेल. वादाचे प्रसंग निभावून न्याल.

शुभ दिनांक : 7, 8

कन्या

कामे मार्गी लावा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. अनेक कामे मार्गी लावता येतील. गोड बोलून काम पूर्ण करा. नोकरीत प्रभाव राहील. कामाचे कौतुक होईल. धंद्यात थकबाकी मिळवा. खरेदी-विक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगले परिचय होतील. क्षुल्लक कारणावरून टीका  करणे टाळा.

शुभ दिनांक : 8, 9

तूळ

नोकरीत कौतुक होईल

बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. उत्साह, आत्मविश्वास पाहून टिका होईल. दुर्लक्ष करा. नोकरीत कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या सहवासात राहाल. तुमचे मुद्दे, कार्य इतरांच्या लक्षात येईल. आप्तेष्टांच्या भेटी होतील.

शुभ दिनांक : 3, 5

वृश्चिक

रागावर ताबा ठेवा

चंद्र, बुध त्रिकोणयोग, मंगळ, गुरू षडाष्टक योग. जवळच्या व्यक्तीशी क्षुल्लक तणाव, वाद होतील. गैरसमज टाळा. रागावर ताबा ठेवा. नोकरीत कामाचा व्याप असेल. धंद्यात चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते यांची नाराजी राहील. मुद्दे प्रभावी ठरतील. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

शुभ दिनांक : 5, 6

धनु

प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. तुमच्या जिद्दीची परीक्षा घेतली जाईल. प्रवासात सावध रहा. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात गोड बोलून यश मिळवा. अरेरावीच्या भाषोने नोकरीत तणाव येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थाने रचली जातील. चतुराईने मने जिंका.

शुभ दिनांक : 5, 6

मकर

प्रगतीचा टप्पा गाठाल

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. तुमच्या बोलण्यातून गैरअर्थ काढला जाईल. कायद्याला धरून कामे करा. नोकरीत क्षुल्लक तणाव राहील. मित्र मदत करतील. धंद्यात व्यावहारिक चर्चा विचारपूर्वक करा. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठाल.

शुभ दिनांक : 7, 8

कुंभ

कामाची प्रशंसा होईल

चंद्र, शुक्र लाभ योग. बुध, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवाया होतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. बढती व बदलीचे योग आहेत. धंद्यात चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे करा. नवीन परिचय ज्ञानात भर घालतील. प्रतिष्ठा लाभेल. घर खरेदी विक्रीत लाभ.

शुभ दिनांक : 4, 5

मीन

संमिश्र स्वरूपाचा काळ

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध त्रिकोणयोग. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत बदल शक्य आहे. मैत्रीत गैरसमज, तणाव जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांच्या कार्यावर भर द्या. जनसंपर्क वाढवताना काळजी घ्या. वाद वाढवू नका. संसारात वाद होतील.

शुभ दिनांक : 7, 8