साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 फेब्रुवारी ते  शनिवार 2 मार्च 2024

 

>>नीलिमा प्रधान 

मेष

कामाचा व्याप राहील 

चंद्र, पा त्रिकोण योग, बुध शनि युती. सप्ताहाच्या पूर्वार्धात संयम ठेवा. नोकरीत कामाचा व्याप नेटाने पूर्ण करून वर्चस्व सिद्ध कराल. धंद्यात प्रगती होईल. कर्जाचे काम करा. कठीण प्रश्न सोडवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टीकोनातून चर्चेत यश मिळेल. नवे मुद्दे प्रभावीपणे ठरवाल.

शुभ दिनांक : 25, 29 

 

वृषभ

तणाव कमी होईल

सूर्य, बुध युती, चंद्र पा त्रिकोण योग. मधुर वाणी, दृढ आत्मविश्वास यावर सप्ताहाच्या पूर्वार्धात अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील तणाव कमी होईल. नवीन परिचय सर्वत्र उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. वरिष्ठ कौतुक करतील. कामे होतील. घरातील तणाव दूर कराल.

शुभ दिनांक : 25, 26 

 

मिथुन

किचकट कामे करून घ्या

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध शुक्र लाभयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. गोड बोलून किचकट कामे करून घ्या. नोकरीत प्र्रगती, लाभ होईल. धंद्यात मोह नको. भावना मध्ये आणू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठरवलेले ध्येय पूर्ण कराल. प्रतिष्ठा वाढेल. गुप्त शत्रू गैरसमज पसरवतील. रागावर ताबा ठेवा.

शुभ दिनांक : 25, 29

 

कर्क

कामात चूक टाळा

सूर्य, चंद्र षडाष्टक, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अरेरावी न करता तुमची कामे करून घ्या. कायदा पाळा. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात कराराची घाई नको. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोपांना उत्तरे देताना शब्द जपून वापरा. वाद वाढवू नका. प्रेमाने जिंकणेच योग्य ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 25, 26

 

सिंह

नोकरीत प्रभाव राहील

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. बुध, शनी युती. गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. याबात सावध राहून पुढील आखणी करा. शत्रूला गाफिल ठेवत तुमचे काम साध्य करा. नोकरीत प्रभाव राहील. मैत्रीत व नात्यात गैरसमज टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात अहंकाराने जनतेशी वागू नका. म्हणजे प्रतिमा अधिक उजळेल.

शुभ दिनांक : 27, 28

 

कन्या

व्यवहारात सावध रहा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. दगदग, धावपळ सर्वत्र होईल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवहारात सावध रहा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत तणाव जाणवेल. मित्र मदत करतील. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल. तणाव जाणवेल. कुणालाही कमी लेखू नका.

शुभ दिनांक : 29, 1

 

तूळ

स्पर्धेत प्रगती होईल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, गुरू लाभयोग. क्षुल्लक अडचणी येतील पण महत्त्वाची कामे होतील. आळस करू नका. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात लाभ होईल मात्र वाद टाळा. हिशेब चुकवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे नेता येईल. वादाचे प्रसंग मिटवून प्रतिष्ठा वाढवता येईल. स्पर्धेत प्रगती होईल. व्यावहारिक कामे करून घ्या.

शुभ दिनांक : 25, 29 

 

वृश्चिक

कार्याला नवी दिशा मिळेल

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, बुध, शनि युती. कायद्याला धरूनच कोणतेही भाष्य करा. मैत्रीत वाढ होईल. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात प्रगती होईल. शत्रुत्व वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला नवी दिशा मिळाल्याने विरोधक आक्रमक होतील. तुम्ही तुमच्या कार्याचा आढावा घ्या. नवे परिचय उत्साह देतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

शुभ दिनांक : 25, 26

 

धनू

कामे रेंगाळत ठेऊ नका 

बुध, शनि युती, सूर्य, गुरू लाभयोग. कोणताही कठीण प्रश्न सोडवण्यची जिद्द ठेवा. कामे रेंगाळत ठेऊ नका. प्रत्येक दिवस हितकारक ठरेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे प्रगती, होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे मुद्दे तयार करून पुरणनीती ठरवा. आत्मविश्वास, उत्साह जनसंपर्क प्रतिमा तेजस्वी बनवा.

शुभ दिनांक : 25, 26 

 

मकर

नव्या दिशेने वाटचाल

सूर्य, बुध युती, बुध, शनि युती. सोमवारपासून कार्याला अधिक वेगाने पुन्याल. नवीन परिचय उत्साहवर्धक, लाभदायक ठरतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. मनाप्रमाणे नव्या दिशेने वाटचाल होईल. धंदा वाराजकीय, सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारी घटना घडेल. तुमचे सह-कार्य मागितले जाईल. कौटुंबिक कामे होतील. स्पर्धा जिंकाल.

शुभ दिनांक : 26, 28

 

कुंभ

प्रवासात घाई नको

बुध, शनि युती, बुध, गुरू लाभयोग. डोके शांत ठेवल्यास अनेक चांगले विचार सुचतील. प्रतिष्ठा वाप्रवासात घाई नको. नोकरीत संयमाने वागा. प्रगतीची संधी लाभेल. धंद्यात गोड बोला. लाभ वावसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक घटना तुमचे धैर्य वापरिचय लाभदायक ठरतील. विचारांना चालना देणारा काळ.

शुभ दिनांक : 25, 29

 

मीन

उतावळेपणा करू नका

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहात ताणतणाव, चिंता जाणवेल. कोणताही करार घाईत, उतावळेपणाने करू नका. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात आर्थिक चणचण जाणवेल. राजकीय, सामाजिक कार्यात मन अस्थिर राहील. तात्पुरत्या घटनांमुळे शरीर, मनावर पfिरणाम होईल. तटस्थ धोरण सर्वत्र उत्तम ठरेल.

शुभ दिनांक : 26, 27