साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 26 नोव्हेंबर ते शनिवार 02 डिसेंबर 2023

 

>>नीलिमा प्रधान

मेष – प्रवासात सावध रहा
मेषेच्या भाग्येषात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. जवळच्या व्यक्ती साहाय्य करतील. उत्साह राहील परंतु जास्त धाडस करणे त्रासदायक ठरेल. आत्मविश्वासाला आवर घाला. प्रवासात सावध रहा. नोकरीत तणाव जाणवेल. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकारयुक्त भाषा नको.
शुभ दिनांक : 26, 27

वृषभ – प्रसंगावधान ठेवा
वृषभेच्या अष्टमेषात बुध, मीनेत राहू व कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. कोणतेही विधान करताना प्रसंगावधान ठेवा. मित्र, नातलग, सहकारी गैरसमज करून घेतील. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात फसगत टाळा. नीट बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. क्षुल्लक नाराजी जाणवेल.
शुभ दिनांक : 28, 29

मिथुन – हलगर्जीपणा नको
मिथुनेच्या सप्तमेषात बुध, मीनेत राहू व कन्येत केतु वक्री, तुळेत शुक्र. कोणतीही समस्या सोडवताना हलगर्जीपणा करू नका. नोकरीतील कामात चूक टाळा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात नम्रता ठेवा. थकबाकी वसूल करा. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध राहून काम करा.
शुभ दिनांक : 1, 2

कर्क – नोकरीत प्रगती होईल
कर्केच्या षष्ठेशात बुध, मीनेत राहू, कन्येत केतू वक्री. तुळेत शुक्र. कठीण कामे पूर्ण करता येतील. शब्द जपून वापरा. मैत्रीची भाषा उपयुक्त ठरेल. धंद्यात व्यावहारिक भाषा समजून घ्या. नोकरीत प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. घरगुती कामे होतील.
शुभ दिनांक : 26, 27

सिंह- अडचणी येतील
सिंहेच्या पंचमेषात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. विरोधकांना नमते घेण्याची वेळ येईल. तुमच्यावर दबाव येईल. वरिष्ठ चुका दाखवतील. नोकरीत अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात न्याय मिळणे कठीण वाटेल. तुमचे मुद्दे योग्य असतील. प्रभाव कमी पडेल. संसारात कामे वाढतील.
शुभ दिनांक : 26,27

कन्या- प्रत्येक दिवस महत्त्वाचा
कन्येच्या सुखस्थानात बुध, मीनेत राहू, कन्येत केतू वक्री. तुळेत शुक्र. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. बोलताना सावध रहा. कायदा पाळा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. परिचय फायदेशीर ठरतील.
शुभ दिनांक : 29, 30

तूळ- मन अस्थिर राहील
तुळेच्या पराक्रमात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री. स्वराशीत शुक्र. सप्ताहाच्या सुरूवातीला मन, शरीर अस्थिर राहील. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. नवे संपर्क वाढतील. कठीण कामे करून घ्या. योजना वेळेत पूर्ण करा. कुटुंबात, नात्यात सोहळ्यात सहभागी व्हा.
शुभ दिनांक : 30, 1

वृश्चिक- फसगत टाळा
वृश्चिकेच्या धनेषात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालणे कठीण वाटेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात फसगत टाळा. व्यावहाfिरक बोलणे योग्य राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती फितूर होण्याचा संभव. गुप्त कारवायांपासून सावध रहा.प्रतिष्ठा जपा.

शुभ दिनांक : 26, 27

धनु- जबाबदारी वाढेल
स्वराशीत बुध, मीनेत राहू व कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र अचानक कार्याला कलाटणी मिळेल. राग वाढेल. गुप्त कारवाया वाढतील. नोकरीत सावध रहा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. तुमच्या विरोधात कारस्थाने होतील. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 29, 30

मकर – महत्त्वाची कामे करा
मकरेच्या कमी व्ययेषात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. अतिमहत्त्वाची कामे करा. शब्द जपून वापरा. नोकरीत वर्चस्व राहील. चांगला बदल होईल. धंद्यात वाढ होऊन नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामांना वेळ द्या. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवा. नवे ध्येय गाठा. कौटुंबिक कामे होतील.
शुभ दिनांक : 26, 27

कुंभ – कामाचा व्याप राहील
कुंभेच्या एकादशात बुध, मीनेत राहू, कन्येत केतु वक्री, तुळेत शुक्र. अडथळे येतील. जिद्दीने यश मिळवता येईल. नोकरीत कामाचा व्याप राहील. दगदग वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कट होतील. शत्रू संताप वाढवणारे कृत्य करतील. मान, प्रतिष्ठा टिकवा. लोकप्रियता वाढेल. समाजकार्य चालू ठेवा.
शुभ दिनांक : 29, 30

मीन- कार्याला गती मिळेल
मीनेच्या दशमेषात बुध, स्वराशीत राहू, कन्येत केतु वक्री. तुळेत शुक्र. तुमच्या प्रत्येक कार्याला गती मिळेल. नातलग, मित्र यांना टाळणे कठीण होईल. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत कराल. ध्येय गाठता येईल. चर्चेत यश मिळेल. नवे परिचय तपासून व्यवहार करा.
शुभ दिनांक : 26, 27