आठवड्याचे भविष्य; रविवार 4 ते शनिवार 10 ऑगस्ट 2019

145

>> नीलिमा प्रधान 

मेष – दूरदृष्टिकोन ठेवा

मेषेच्या पंचमेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात तुमच्या अडचणीत वाढ होईल.  व्यवसायात समस्या येईल. नोकरीत सावधपणे लक्ष देऊन काम करा. सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच कमकुवत ठरू शकतात. मागील अनुभव व दूरदृष्टिकोन समोर ठेवा.   शुभ दिनांक – 6, 7

वृषभ – संधीचा लाभ घ्या

वृषभेच्या सुखेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-गुरू त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात अंदाज बरोबर येईल. प्रगतीची संधी कापराच्या वडीसारखी असते. तिचा लाभ घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. सामाजिक क्षेत्रात चांगले काम कराल. कलाक्षेत्रात प्रसिद्धी, मिळेल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल.     शुभ दिनांक –  4, 5

मिथुन – अधिकाराचा वापर करा

मिथुन राशीच्या पराक्रमात मंगळ राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात अडचणीत आलेली कामे करून घ्या. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. कोर्ट केसमध्ये तणाव दूर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकाराचा वापर करा. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.                           शुभ दिनांक – 5, 6

कर्क – ध्येयावर लक्ष ठेवा

कर्केच्या धनेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-गुरू त्रिकोणयोग होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम या सप्ताहात पूर्ण करू शकाल. व्यवसायात जम बसेल. वरिष्ठांचा पूर्ण  विश्वास बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करा. हेकेखोरपणा करण्यापेक्षा ध्येयावर लक्ष ठेवा.    शुभ दिनांक – 4, 5

सिंह – मनोबल राखा

स्वराशीत मंगळ राश्यांतर, चंद्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. कठीण परिस्थितीबरोबर सामना करावा लागेल. भागीदार तुम्हाला कोंडीत पकडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध राहा. मनोबल टिकवून ठेवा. नोकरीत हतबल न होता काम करा. कुटुंबात तणाव व वाद होईल.            शुभ दिनांक – 6, 7

कन्या – आर्थिक गुंतवणूक करा

कन्येच्या व्ययेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. रेंगाळत राहिलेली, किचकट कामे लवकर पूर्ण करा. व्यवसाय-नोकरीत जम बसवून ठेवा. योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करा. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अडचणी वाढवण्याचा प्रयत्न उलथवून लावता येईल.     शुभ दिनांक – 6, 7

तूळ – परदेशी जाण्याचा योग

तुळेच्या एकादशात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरी धंद्यात तुमचे वर्चस्व राहील. वरिष्ठांना मदत करण्याने तुमचे कौतुक होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात भविष्यातील यशासाठी उत्तम योजना बनवा. तुमची प्रतिष्ठा वाढेल. सहकार्य मिळेल.              शुभ दिनांक – 9, 10

वृश्चिक – डावपेच यशस्वी होतील

वृश्चिकेच्या दशमेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात चांगली वाढ करू शकाल. ओळख उपयोगी पडेल. नोकरीत बदल करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. दौऱयात मान-प्रतिष्ठा वाढेल. परदेशात जाण्याचा योग येईल.                                    शुभ दिनांक – 4, 5

धनु – सावधगिरी बाळगा

धनुच्या भाग्येषात मंगळ राश्यांतर, मंगळ-प्लुटो षडाष्टक योग होत आहे. मनस्ताप देणाऱया माणसांपासून दूर रहा. व्यवसायात अडचण येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध राहा. आरोप, टीका होईल. प्रश्न कोणताही असो, तुम्हाला नम्रता व जिद्द ठेवावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा.  शुभ दिनांक – 4, 5

मकर – प्रगतीची संधी लाभेल

मकरेच्या अष्टमेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात-नोकरीत प्रगतीची नवीन संधी येईल. विचारपूर्वक करार करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चर्चा सफल होईल. भेट घेता येईल. मकर राशीला साडेसाती सुरू आहे. नवीन विषय व माणसांचे विविध अनुभव हेच तुमचे खरे शिक्षण असेल.      शुभ दिनांक – 4, 5

कुंभ – संयमाने मार्ग शोधा

कुंभेच्या सप्तमेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. मनस्ताप व शारीरिक ताण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जपून संवाद साधा. सर्व परिस्थितीवर संयमाने मार्ग शोधता येईल. भावना व कर्तव्य, व्यवहार यांच्यात सांगड घालावी लागेल.                 शुभ दिनांक – 9, 10

मीन – शेअर्सचा अंदाज येईल

मीन राशीच्या षष्ठsषात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभ योग होत आहे. व्यवसाय-नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. शेअर्सचा अंदाज घेऊ शकाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठण्यात यश मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत अलौकिक यश मिळेल.                                                     शुभ दिनांक –  4, 5

आपली प्रतिक्रिया द्या