साप्ताहिक राशिभविष्य – 04 जानेवारी ते 10 जानेवारी 2020

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
जोडीदार मिळेल
प्रेमाचा आठवडा असेच येणाऱया दिवसांचे वर्णन करावे लागेल.अविवाहितांचे विवाह जुळतील. महत्त्वाच्या कामात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. भावनिकदृष्टया एकमेकांच्या जवळ याल. ऊर्जेची कमतरता जाणवेल. गुलाबी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नवे कपडे, फुलं

वृषभ
मनःसामर्थ्य
अंगभूत कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे तुम्हाला यश मिळेल. बाहेरचा प्रवास शक्यतो टाळा. निळा रंग जवळ बाळगा. शनिवारी मारुतीची उपासना करा. त्यामुळे मानसिक सामर्थ्य वाढेल.
शुभ परिधान – मफलर, लोकरीचे कपडे

मिथुन
वरिष्ठांकडून कौतुक
तुमची कल्पकता आणि नियोजन यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. यातून अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. चमेलीची फुले घरात ठेवा. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पाचूचा खडा, पाय मोजे

कर्क
लाभाचा आठवडा
घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. फायदा होईल. लाभदायक फळ देणारा आठवडा. जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. अबोली रंग जवळ बाळगा. अनावश्यक फिरणे टाळा.
शुभ परिधान – शाल, ब्लेझर

सिंह
अभिमानास्पद कामगिरी
एखाद्या मोठय़ा कार्यात तुमचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. त्याचा तुमच्या घरच्यांना अभिमान वाटेल. अनावश्यक खर्च टाळा. गणपतीची उपासना करा. लाल रंग जवळ बाळगा. अनपेक्षित संकटांना सहज मात देऊ शकाल.
शुभ परिधान – सोन्याच्या पाटल्या, रेशमी साडी

कन्या
मजेचे दिवस
अनेक आनंदी क्षण या आठवडय़ात तुम्हाला आनंदी करतील. त्यामुळे दिवस मजेत जातील. सुटीचा आनंद घ्याल. हातून अनेक कल्पक गोष्टी घडतील. घरच्यांची उत्तम साथ लाभेल. आवडीच्या वस्तूंची खरेदी होईल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – जॅकेट, सुगंध

तूळ
केंद्रस्थानी राहाल
घरातील काही गोष्टींमुळे मनास अस्वस्थता येईल. पण काळजी करू नका. आपसूक गोष्टी मार्गी लागतील. तुमची बुद्धिमत्ता कामास येईल. त्यामुळे तुम्ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असाल. मन अत्यंत कणखर ठेवावे लागेल. भगवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – बांधणीची साडी, टोपी

वृश्चिक
प्रशंसा होईल
लाभदायक आठवडा, सरकारी कर्मचाऱयांना कामाच्या ठिकाणी लाभ होईल. विशेषतः लष्करी अधिकारी. त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली जाईल. त्यामुळे घरातही उत्साहाचे वातावरण राहील. आप्तस्वकीयांच्या भेटी होतील. राखाडी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – काश्मिरी सिल्क, कुर्ता

धनु
आवडत्या गोष्टी
कामाच्या ठिकाणी उगाच तणावाचे प्रसंग निर्माण होतील. पण तुम्हीही अलिप्त राहा. आवडत्या व्यक्तीशी भेट होईल. त्यामुळे अनेक सकारात्मक गोष्टी कराव्याशा वाटतील. अर्थ प्राप्ती होईल. त्यामुळे खर्च करावासा वाटेल. अबोली रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – कमरपट्टा, जोडवी

मकर
ज्ञानात भर
नियमित व्यायाम आणि आहारातील संतुलन महत्त्वाचे ठरेल. जन्मगावी जाण्याची संधी येईल. घरातील लहान मुलांसाठी खर्च कराल. नव्या व्यक्ती भेटतील. गप्पा होतील. ज्ञानात भर पडेल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेट्रो पोशाख, ओढणी

कुंभ
कायद्याचं बोला
महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय जपून घ्या. मोठे आर्थिक व्यवहार कराल. पण त्यात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. फसवणूक होण्याचे प्रसंग येतील. कायदा पाळा. कामानिमित्त बाहेर जाल. लाल रंग जवळ बाळगा. शिव उपासना करा.
शुभ परिधान – रुद्राक्ष, खादीचा कुर्ता

मीन
उच्चपदाचे योग
उच्च पदाचे योग येतील. त्यासाठी जीवतोड केलेली मेहनत कामी येईल. केलेल्या कामाबद्दल पारितोषिक मिळेल. पण खेळाडूंनी असंतुष्ट असावे. मेहनतीत कसूर नको. हिरवा रंग जवळ बाळगा. बाहेरील आहार टाळा. घरातील व्यक्तींशी भावनिक बंध दृढ होतील.
शुभ परिधान – साडी, सुवर्णालंकार

[email protected]