साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 डिसेंबर 2025 ते शनिवार 20 डिसेंबर 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – शब्द जपून वापरा

मेषेच्या भाग्येषात रवि, शुक्र चंद्र मंगळ लाभयोग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. जे ठरवाल ते पूर्ण होईल असे गृहित धरू नका. शब्द जपून वापरा. धंद्यात वाद नको. नवे काम मिळेल. योजनांना साथ मिळेल. अतिशयोक्ती नको.

शुभ दि. 15, 16

वृषभ – संयमाने प्रश्न सोडवा

वृषभेच्या अष्टमेषात सूर्य, शुक्र. चंद्र बुध युती. वाद निर्माण होईल. संयमाने कोणतेही प्रश्न सोडवा. नोकरीत व्याप वाढेल. कामात बदल केला जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. कामात तत्परता ठेवा.

शुभ दि. 14, 18

मिथुन – वाद वाढवू नका

मिथुनेच्या सप्तमेषात सूर्य, शुक्र. चंद्र मंगळ लाभयोग. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीत स्पर्धा असेल. वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवी संधी मिळेल. योजना पूर्ण करा.

शुभ दि. 14, 15

कर्क – वरिष्ठांना दुखवू नका

कर्केच्या षष्ठेशात सूर्य, शुक्र. चंद्र बुध युती. अरेरावी करू नका. कामात अडचणी येतील.  वरिष्ठांना दुखवू नका. नवे काम मिळवा. कायदा मोडेल असे कृत्य टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाईट ठरवण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दि. 14, 18

सिंह – प्रकृतीची काळजी घ्या

सिंहेच्या पंचमेषात मंगळ, चंद्र गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. अहंकाराची भाषा दूर ठेवा. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिका होईल. महत्त्वाची चर्चा गुप्त ठेवा.

शुभ दि. 12, 13

कन्या – लोकप्रियता वाढेल

कन्येच्या सुखस्थानात सूर्य, शुक्र. चंद्र बुध युती. चातुर्य व मधुर वाणी यांचा मेळ घालून कामाची तयारी ठेवा. नोकरीत किचकट कामे करून दाखवाल. धंद्यात योग्य निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल.

शुभ दि. 14, 15

तूळ – रागावर नियंत्रण ठेवा

तुळेच्या पराक्रमात सूर्य, शुक्र चंद्र बुध युती. रविवारी अडचणीतून मार्ग काढाल. कला, साहित्यात प्रगतीची संधी लाभेल. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभेल.  रागावर नियंत्रण ठेवा.

शुभ दि. 17, 18

वृश्चिक –  दिशाभूल होईल

वृश्चिकेच्या धनेषात सूर्य, शुक्र राश्यांतर चंद्र, बुध युती. उत्साह देणारी घटना घडेल. आत्मविश्वासात भर पडेल. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर नजर ठेवा.

शुभ दि. 14, 20

धनु – अडथळे दूर होतील

स्वराशीत सूर्य, शुक्र, चंद्र गुरू त्रिकोणयोग. भावनेच्या भरात कोणालाही आश्वासन देऊन ठेऊ नका. प्रतिष्ठा जपण्यासाठी कष्ट पडतील. मोह, व्यसन नको. नोकरीतील अडथळे दूर होतील. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दि. 15, 16

मकर – वाहनाचा वेग कमी ठेवा

मकरेच्या व्ययेषात सूर्य, शुक्र चंद्र बुध युती. कुणाच्याही दबावाखाली न येता निर्णय घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात सावध रहा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला विरोध होईल.

शुभ दि. 14, 17

कुंभ –  चातुर्याने भाष्य करा

कुंभेच्या एकादशात सूर्य, शुक्र राश्यांतर, चंद्र बुध युती. अडचणी कमी होतील. महत्त्वाची कामे करून घ्या. चातुर्याचे भाष्य महत्त्वाचे ठरेल. साहित्य, कला क्षेत्रात नविन कल्पना सुचतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी विचार जुळतील.

शुभ दि. 15, 16

मीन – प्रगतीचा मार्ग मिळेल

मीनेच्या दशमेषात सूर्य, शुक्र चंद्र मंगळ लाभयोग. तुमच्या धाडसी स्वभावाचे कौतुक होईल. कामाची तत्परता, कौशल्य याची दखल घेतली जाईल. प्रगतीचा मार्ग मिळेल. नोकरीत दगदग झाली तरी वर्चस्व वाढेल. व्यसन टाळा.

शुभ दि. 14, 18