साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 01 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 07 फेब्रुवारी 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – चर्चेत यश मिळेल

मेषेच्या एकादशात बुध, शुक्र क्षुल्लक कारणाने  विचलीत न होता कामे करा. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. धंद्यात मनाप्रमाणे कामे होतील. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध काम करण्याची वेळ येऊ शकते. शुभ दि. 3, 4

वृषभ – प्रत्येक दिवस महत्त्वाचा

वृषभेच्या भाग्येषात बुध, शुक्र. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. नविन परिचय उत्साह वाढवतील. नोकरीत प्रभाव वाढेल. किचकट कामात यश मिळेल. चांगले मार्गदर्शन लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मदत घेत योजना पूर्ण करा.  शुभ दि. 5, 6  

मिथुन –प्रगतीचा टप्पा गाठाल

मिथुनेच्या भाग्येषात बुध, शुक्र. आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करा. वेळेला महत्त्व द्या. प्रगतीचा नवा टप्पा गाठाल. तुमच्या क्षेत्रात उन्नती होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे नम्रपूर्वक व्यक्त करा. शुभ दि. 2, 3

कर्क – वाहनाचा वेग कमी ठेवा

कर्केच्या अष्टमेषात बुध, शुक्र. शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. प्रकृती सांभाळा. नविन परिचयाशी कुठलाही व्यवहार करण्याची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा नको. शुभ दि. 3, 5

सिंह – प्रकृतीची हेळसांड नको

सिंहेच्या अष्टमेषात बुध, शुक्र. विरोधकांना कमी लेखू नका. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. नोकरी टिकवा. वाद टाळा. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानकारक भाष्य ऐकावे लागेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. शुभ दि. 5, 6

कन्या – कठोर भाष्य टाळा

कन्येच्या षष्ठेशात बुध, शुक्र. कठोर भाष्य करून कुणालाही दुखवू नका. आपलेपणा टिकवणे सोपे नसते. किरकोळ अडचणींवर मात करून यश संपादन करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निष्कारण समस्या निर्माण होतील. शुभ दि. 6, 7

तूळ – महत्त्वाची कामे करा

तुळेच्या पंचमेषात बुध, शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला अतिमहत्त्वाची कामे करा. राग, अहंकाराची भाषा दूर ठेवा. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा. नोकरीधंद्यात ताळमेळ साधा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेवर आक्षेप येईल. शुभ दि. 1, 2

वृश्चिक – जिद्दीने यश मिळवाल

वृश्चिकेच्या सुखेशात बुध, शुक्र. कोणत्याही कठीण प्रसंगावर चातुर्याने, जिद्दीने यश मिळवता येईल. अतिचांगुलपणा नको. नोकरीधंद्यात मदत होईल. वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडथळे येतील. मार्ग शोधा. शुभ दि. 1, 2

धनु – अडचणींवर मात कराल

धनुच्या पराक्रमात बुध, शुक्र. क्षेत्र कोणतेही असो अडचणींवर मात कराल. स्वतचे वर्चस्व सिद्ध कराल. तेव्हा संधी सोडू नका. मेहनत घेऊन मोठे ध्येय गाठा. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 3, 4

मकर – चौफेर सावध रहा

मकरेच्या धनेषात बुध, शुक्र चौफेर सावध रहा. गाफिल राहिल्यास गुप्त कारवाया वाढतील. चातुर्य ठेवा. निष्कारण आक्रमक भूमिका नको. नोकरीधंद्यात टिकून रहा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे शिकाल. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 6, 7

कुंभ – संयमी भूमिका घ्या

स्वराशीत बुध, शुक. साडेसाती सुरू आहे. सप्ताह अडचणी वाढवणारा ठरेल. गोड बोला. चातुर्य वापरा. यश मिळवा. संताप वाढवणाऱया घटना घडतील. संयमी भूमिका घ्या. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 3, 4

मीन – शब्द जपून वापरा

मीनेच्या व्ययेशात बुध, शुक्र साडेसातीचे पर्व सुरू आहे. नात्यात, मैत्रीत शब्द जपून वापरा. तुमच्या बोलण्याचा विपर्यास केला जाईल. नोकरीत क्षुल्लक चूक टाळा. सहकारी स्पर्धा करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील.   शुभ दि. 5, 6