साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 19 ते शनिवार 25 मार्च 2023

>> नीलिमा प्रधान

मेष: वाद दूर ठेवा

चंद्र, बुध युती. चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो वक्तव्य करताना घाई नको. सावधपणे बोला. नोकरी टिकवा. धंद्यात वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक परिचय होतील. चर्चा होईल. तुमचे डावपेच गुप्त ठेवा. आरोप सहन करावे लागतील. कुटुंबात चिंता सतावेल. स्पर्धा कठीण आहे.  

शुभ दिनांकः 24, 25

वृषभ: नोकरीत वर्चस्व राहील

सूर्य, प्लुटो लाभयोग, चंद्र, शुक्र युती. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. आळस, मोह टाळा. नविन ओळख नीट पारखून घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. सहकारी कारवाया करतील. धंद्यात तारतम्य ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान लाभेल. जवळच्या व्यक्ती अडचणी निर्माण करतील.

शुभ दिनांक: 22, 23   

मिथुन: बढतीची संधी मिळेल

चंद्र, शुक्र लाभयोग. चंद्र, बुध युती. रविवार तणाव, वाद उद्भवतील. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. बढतीची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. थोरामोठय़ांच्या साहाय्याने तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारप्राप्ती होईल. योजनांना गती मिळेल. मुद्दे प्रभावी ठरतील.

शुभ दिनांक: 22, 23

कर्क: डावपेच प्रभावी ठरतील

मंगळ, प्लुटो षडाष्टकयोग. चंद्र, बुध युती असेल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. वादाचे प्रसंग टाळा. नोकरीधंद्यात पुढे जाल. वसुली, कर्जाचे काम करा. नविन घरासंबंधी चर्चा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच प्रभावी ठरतील. अधिकार लाभेल. विरोधकांना कमी लेखू नका.   

शुभ दिनांक: 22, 24

सिंह: अहंकार दूर ठेवा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, बुध युती. प्रेमाने, बुद्धिचातुर्याने मने जिंका. तणाव होईल. अहंकाराने नुकसान होईल. नोकरी टिकवा. कामात चूक होईल. धंद्यात कामापुरते बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानहानी टाळा. सहनशीलता ठेवा. कायद्याला धरून वक्तव्य करा. स्पर्धा कठीण आहे.         

शुभ दिनांक: 24, 25

कन्या: शुभ समाचार मिळेल

चंद्र, गुरू युती, चंद्र, मंगळ लाभयोग. सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. गुढीपाडव्याला शुभ समाचार मिळेल. नोकरीधंद्यात प्रभाव राहील. गुप्त कारस्थाने त्रस्त करतील. मैत्रीत वाद, गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. प्रद, प्रतिष्ठा मिळेल. मात्र सावध रहा.

शुभ दिनांक: 22

तूळ: तारेवरची कसरत

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. प्रसंगावधान बाळगा. यश मिळेल. नोकरीत तारेवरची कसरत करावी लागेल. धंद्यात फायदा करून घ्या. अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामावर टिका होईल. निराश वाटेल. स्वतŠची प्रतिष्ठा जपा.

शुभ दिनांक: 24, 25

वृश्चिक: संयम बाळगा

चंद्र, गुरू युती, मंगळ, प्लुटो षडाष्टक योग. संयमाने प्रश्न सुटेल. राग आवरा. नोकरीत सहकारी त्रस्त करतील. वरिष्ठ तुमच्या बाजुने असतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त शत्रू तुमच्या विरोधात गेरसमज पसरवतील. तुम्ही अस्थिर होऊ नका. मन विचलीत न होता कामावर लक्ष केंद्रित करा.  

शुभ दिनांक: 19, 22

धनु: विचारांना चालना मिळेल

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, बुध युती. प्रत्येक दिवस तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा असेल. विचारांना चालना मिळेल. नोकरीत प्रसंगावधान ठेवा. धंद्यात सुधारणा होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बाजुने अनेक सहकारी, नेते ठाम उभे राहतील.

शुभ दिनांक: 19, 22

मकर: धंद्यात वाद टाळा

चंद्र, गुरू युती, मुगळ, प्लुटो षडाष्टक योग. मनाविरुद्ध घटना घडतील. विरोधकांना संधी देऊ नका. नम्रता ठेवा. नोकरीत मेहनत प्रभावी ठरेल. धंद्यात वाद टाळा. हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा बोलबाला होईल. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. मगच बोला. कायदा पाळा.

शुभ दिनांक:22, 23

कुंभ: प्रगतीचा मार्ग मिळेल

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, बुध युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग शोधाल. उत्साहात राहाल. नोकरीत बढती होईल. धंद्यात वाढ होईल. गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक दिग्गजांच्या ओळखी हातील. तुमच्या मुद्यांचे कौतुक होईल. स्पर्धेत यश मिळेल.

शुभ दिनांक: 22, 23

मीन: ध्येयावर लक्ष ठेवा

चंद्र, बुध युती, मंगळ, प्लुटो षडाष्टक योग. क्षुल्लक तणावांना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे संधी मिळेल. राजकीय, सामाaिजक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडेल. प्रकृतीत सुधारणा होईल. चालना मिळेल. जिद्द ठेवा.

शुभ दिनांक: 22, 23