वेटलिफ्टर प्रदीप डोपिंगमध्ये दोषी, चार वर्षांसाठी निलंबित

218

कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणारा वेटलिफ्टर प्रदीप सिंग डोपिंगमध्ये दोषी सापडला आहे. खेळामध्ये प्रगती करण्यासाठी शक्तिवर्धक द्रव सेवन केल्यामुळे त्याच्यावर सध्या चार वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पटियाळा येथे डिसेंबर खेळाडूंच्या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेथे प्रदीप सिंग याचे सॅम्पल घेण्यात आले. त्यानंतर हे चाचणीसाठी वाडाच्या दोहा येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले. मार्च महिन्यातच या चाचणीचा निकाल आला होता, पण बी सॅम्पलचे नमुने घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निकाल सर्वांसमोर जाहीर करण्यात आला नाही. बी सॅम्पल घेण्यात आल्यानंतर हा निकाल मीडियासमोर जाहीर करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या