पश्चिम बंगालमध्ये हवेतून पसरतोय कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालात गेल्या काही दिवसांपासून कोविडचे विषाणू हवेमधून पसरण्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे सामाजिक संसर्ग होण्याची भीती अधिक संभावते. परिणामी येत्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करील सूचना केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, कोविडविरोधात जाहीर करण्यात आलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. येत्या काळात सामुदायिक संसर्गाची भीती अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात या नियमांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.