
मुंबई नंतर पश्चिम बंगालमधील लोकल सेवा सुरू झाली आहे. दिवाळी सणापूर्वी लोकल सेवा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भारतीय रेल्वेने दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगालमधील लोकल सेवा सुरू केली आहे. सुरक्षा उपाययोजना करून 11 नोव्हेंबर पासून बंगालमधील रेल्वे सेवा सुरू केली जाई असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यापूर्वी जाहीर केले होते.
पूर्व रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार बंगालमध्ये लोकल सेवा सुरू झाली आहे. अशावेळी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून प्रवाशांना सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
West Bengal: Suburban railway services resume in the state from today. Visuals from Naihati and Kankinara railway stations in North 24 Parganas district.
696 suburban services are resuming in the state from today, after months of lockdown in the wake of #COVID19 pandemic. pic.twitter.com/1SmhnL1WBj
— ANI (@ANI) November 11, 2020
कोरोना साथरोगामुळे बंगालमधील लोकल सेवा 7 महिन्यांपासून बंद होती. आता लोकल सेवा जरी सुरू केली असली तरी इएमयु लोकलमध्ये पूर्वीसारखी गर्दी नाही. सियालदह विभागात 413 तर हावडा विभागात 202 लोकल सुरू कराण्यात आल्या आहेत. तर दक्षिण पूर्वे रेल्वेकडून 81 गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
























































