पश्चिम बंगालमध्ये संघ कार्यकर्त्याची पत्नी, मुलासह हत्या

248

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या एका शिक्षकाची, त्यांच्या गर्भवती पत्नी आणि मुलासह निर्घृण हत्या करण्यात आली. घरात घुसून धारदार शस्त्राने हे हत्याकांड करण्यात आल्याने मुर्शिदाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्याकांडाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

मुर्शिदाबादमधील जियागंड परिसरात बंधू प्रकाश पाल (35) हे आपल्या पत्नी मोंडल पाल (30) आणि मुलगा अंगन बंधू पाल (5) यांच्यासह राहत होते. सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात तिघेही निपचित पडल्याचे दिसले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंधू प्रकाश पाल हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. बंधू प्रकाश पाल हे संघाचे स्वयंसेवक होते. नुकत्याच झालेल्या दसरा संचलनात त्यांनी सहभाग घेतला होता असे पश्चिम बंगालमधील संघाचे नेते जिष्णू बसू यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या