
पश्चिम बंगाल विधानसभा निवडनिक जवळ येत असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) मधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढताना दिसत आहे. हे प्रकरण हिंसाचार आणि हत्येपर्यंत पोहोचले आहेत. आजही बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.
टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कूचबिहारमध्ये हाणामारी झाली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लाठीचार्ज केला. भाजपाने सातत्याने पश्चिम बंगाल पोलिसांवर पक्षपात केल्याचा आरोप करत आहे. गुरुवारी भाजपने कार्यकर्त्यांना मारहाण आणि मृत्यूविरोधात 12 तासांचा बंद पुकारला होता. यावेळी त्यांचं टीएमसी कार्यकर्त्यांशी भांडण झालं.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांवरील हिंसाचाराचा उल्लेख केला होता.

























































