
यूएईमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत वेस्ट इंडीजला श्रीलंकेने 20 धावांनी पराभूत केले. या पराभवासह गतविजेत्या वेस्ट इंडीजचा संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर फेकला गेला. या पराभवामुळे निराश झालेला अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ड्वेन ब्रावो निराश झाला. माजी कर्णधार डेरेन सामी आणि समालोचक अॅलेक्स जॉर्डन यांच्याशी चर्चेदरम्यान त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार असल्याचे सांगितले. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा टी-20 सामना आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल असे ब्रावोने स्पष्ट केले.
Today we farewell a @windiescricket superstar from international cricket 🙌
Read more on @DJBravo47‘s retirement 👉 https://t.co/2ifYEKFml3 #T20WorldCup pic.twitter.com/tBCvqZL8xt
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021
‘माझी कारकिर्द खूपच चांगली राहिली असून निवृत्त होण्याची हिच योग्य वेळ आहे असे मला वाटते. 18 वर्ष वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करताना अनेक चढ-उतार पाहिले. मात्र मागे वळून पाहताना या क्षेत्रात कॅरेबियन लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली याबाबत मी आभार मानतो. कारकिर्दीमध्ये आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणे हे मोठे यश आहे’, असे ब्रावो म्हणाला.
तसेच जशी आम्हाला आशी होती तसा हा विश्वचषक आमच्यासाठी गेला नाही. ही एक तुल्यबळ संघांची स्पर्धा आहे. त्यामुळे कामगिरीबाबत खेद व्यक्त करण्याची गरज नाही. माझ्याकडे जो अनुभव आणि खेळाबाबत माहिती आहे ती मी युवा खेळाडूंना देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही ब्रावो म्हणाला.
Virat Kohli वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत 2 वर्ल्डकप जिंकणारा कोहली झाला 33 वर्षाचा
दरम्यान, 38 वर्षीय ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती घेतली आहे. याआधी 2018 मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, मात्र 2019 मध्ये पुनरागमन केले होते. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडीजसाठी 294 लढती खेळल्या असून यात 6413 धावा आणि 363 विकेट्स घेतल्या आहेत.





























































