फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 172 कोटींचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमांमधून 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून 172 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला. यात वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे 3.5 कोटी रुपयांची दंडवसुली केली. तसेच महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले.

पश्चिम रेल्वे मार्गावर व्यापक आणि सातत्यपूर्ण तिकीट तपासणी मोहिमांद्वारे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू आहेत.