पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांना वेग, 118 कोटींचा खर्च

पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांना लवकरच वेग येणार आहे. पाच वॉर्डमध्ये होणाऱयाया कामांसाठी पालिका 118 कोटींवर खर्च करणार असून पावसाळ्याआधीही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यावर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेली रस्त्याची कामे वेगाने होण्यासाठी सुमारे 6 ते 10 टक्के वाढीव दराने कामे करून घ्यावी लागणार आहेत. गेल्या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्यामुळे पालिकेची अनेक कामे आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडली होती.याचा मोठा फटका रस्त्यांच्या कामांना बसला आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रियाच सुरू झाली नसल्याने काम कसे होणार, असा प्रश्ननिर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरून पावसाळ्याआधी जास्तीत जास्त रस्त्यांचीकामे पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांचेप्रस्ताव मंजुरीसाठी मांडणार आहे. 

असे होणार काम…

पश्चिम उपनगरातील आर/मध्य-लिंक रोड येथे सिमेंट काँक्रेट रोडवरील तुटलेलेपॅनेट, लगतच्या पट्टय़ा, फुटपाथचे काँक्रिटीकरणकरण्यात येणार आहे. यासाठी 40 कोटी38 लाख 77 हजार 961 रुपयेखर्च केले जाणार आहेत. पी-दक्षिण  विभागातील विविध रस्त्यांचे सिंमेट काँक्रिटीकरण करून सुधारणा करणे. 20 कोटी 5 लाख 42 हजार 607रुपये खर्च. आर-दक्षिणस्वयंभू गणेश मंदिर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करून सुधारणा करणे. 4 कोटी 98 लाख32 हजार 417 रुपये खर्च.पी-उत्तर – लिंक रोड, मालाड पश्चिमयेथील रस्त्यालगतच्या पट्टय़ांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून सुधारणा करणे. 46कोटी 81 लाग 60 हजार554 रुपये खर्च.आर/मध्य – विभागातील विविध रस्त्यांचे सिंमेट काँक्रिटीकरण,पॅसेजचे काँक्रिटीकरण करून सुधारणा करणे. 5 कोटी80 लाख 60 हजार 502 रुपये खर्च. 60:40 फॉर्म्युल्यानुसारच काम देणाररस्त्यांची कामे झाल्यानंतर निर्धारितहमी कालावधीत पाच वर्षांपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदारावर असते. मात्र अनेक वेळा काम झाल्यानंतर कंत्राटदार रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजवणे या कामांकडे दुर्लक्ष करतात. याचा नाहक त्रास मुंबईकरांना होतो. शिवाय पालिकेला टिकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे यापुढे रस्त्यांची कामे ‘6040’ फॉर्म्युल्यानुसारच देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाआहे. यात कंत्राटदारला काम पूर्ण झाल्यानंतर 60 टक्के रक्कमच देण्यात येईल. उर्वरित 40 टक्के रक्कम कामाचा हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल. या आधी हमी कालावधीपर्यंत 20 टक्के रक्कम मागे ठेवली जात होती.

आपली प्रतिक्रिया द्या