मुलीचे पहिल्यांदा पिरियडस् येताना, आईने तिला काय समजावून सांगणं गरजेचं आहे

मासिक पाळी येण्याचे कोणतेही निश्चित वय नाही. बहुतेक मुलींना 13 वर्षांच्या आत मासिक पाळी येते. त्यामुळे एखाद्याला 11 वर्षांच्या वयातही मासिक पाळी येऊ शकते. परंतु मासिक पाळी ही प्रत्येक मुलीच्या तब्येतीवर अवलंबून असते. प्रत्येक मुलीच्या मनात एका ठराविक वयानंतर मासिक पाळीविषयी अनेक प्रश्न डोकावत असतात. याकरता सर्वप्रथम मासिक पाळी येण्याआधी आपल्या शरीरामध्ये कोणते बदल होतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

मासिक पाळी येण्याआधी शरीरात होणारे बदल

बहुतांशी मुलींमध्ये स्तनांचा विकास हा साधारणतः 10 ते 11 या वयोगटामध्ये होत असतो. मासिक पाळी येण्याचे हे सर्वात पहिले लक्षण आहे.

शरीरावर खासगी भागांवर केस दिसू लागणे त्यांची वाढ होणे हे देखील मासिक पाळीचे लक्षण आहे.

मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी ही योगासने आहेत सर्वात बेस्ट

 

 

मासिक पाळीच्या वेळी काय काळजी घेणे गरजेचे आहे

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीला आजार मानू नका. या काळात तुमच्या आहाराची काळजी घ्या.

मासिक पाळीच्या दिवसात मसालेदार अन्न टाळा. हलका आहार घ्या, फळे किंवा रस जास्त प्रमाणात घ्या.

मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप देखील आवश्यक आहे.

मासिक पाळीच्या काळात मूड स्विंग आणि पोटदुखी ही सामान्य गोष्ट आहे.

पॅडचा योग्य वापर

पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तुम्हाला पॅड कसे वापरायचे हे माहित नसते. अशा परिस्थितीत, पॅडचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल तुम्ही YouTube वर व्हिडिओ पाहू शकता. हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्याकडे मासिक पाळीशी संबंधित माहिती आधीच असेल, तर पहिली मासिक पाळी संस्मरणीय आणि नक्कीच सोपी वाटेल.